राहुल गांधींनी माजी मुख्यमंत्र्यांना फटकारले, ‘असली भाषा चालणार नाही !’

वायनाड (वृत्तसंस्था) : कमलनाथ यांनी वापरलेली भाषा मला अजिबात आवडलेली नाही. असली भाषा चालणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना चांगलंच फटकारलं. कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल ‘आयटम’ शब्द वापरल्यामुळे देशभर वाद निर्माण झाला होता. त्यावरून राहुल गांधी यांनी त्यांना ही समज दिली.

राहुल गांधी हे सध्या आपला मतदारसंघ असलेल्या वायनाडच्या दौऱ्यावर गेले आहेत. आज (मंगळवार) त्यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नावर कमलनाथ यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मध्य प्रदेशात पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरू आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला होता. त्यावरून राजकारण तापलं असून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. राहुल गांधी म्हणाले की, कमलनाथ हे काँग्रेस पक्षाचे आहेत, मात्र अशा प्रकारची भाषा योग्य नाही. कुठल्याही नेत्याला अशी भाषा वापरणं हे चांगलं नाही. मला अशी भाषा वापरणे हे मुळीच आवडलेलं नाही. हे वक्तव्य दुर्दैवी आहे.

Live Marathi News

Recent Posts

कोरोना अपडेट : दिवसभरात १६०१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल…

13 hours ago