नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट 150 जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे.
मिळालेल्या माहिनुसार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटक निकालाची मध्य प्रदेशात पुनरावृत्ती होईल असं म्हटलं आहे. काँग्रेस कर्नाटकातील कामगिरीची पुनरावृत्ती करेल आणि आगामी मध्य प्रदेश निवडणुकीत १५० जागा जिंकेल असं म्हटलं आहे. याबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली असून या बैठकीदरम्यान प्रदेश, राजस्थानच्या विधानसभा निवडणूकीसाठी रणनिती आखणीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
अन् कर्नाटकमध्ये काँग्रेसने मारली मुसंडी
कर्नाटक विधानसभेच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य़ासह देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी कर्नाटकमध्ये तळ ठोकत आपली सर्व ताकद पणाला लावली मात्र जनतेने थेट कौल काँग्रेसला दिल्याने ऑपरेशन लोटस कर्नाटकमध्ये फेल ठरलं आणि भाजपला अवघ्या 66 जागांवर समाधान मानावं लागलं तर काँग्रेसने मुसंडी मारत 135 चा आकडा गाठला अन् भाजपला पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे काँग्रेस मध्य प्रदेशात देखील गतीने चाली खेळत असल्याचं वृत्त आहे.