नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) स्वत: ट्विट करत ही माहिती दिली. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर चाचणी केली असता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे.

नुकतीच राहुल गांधी यांनी करोनाचा कहर वाढत असल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा केली होती. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सौम्य लक्षणंं जाणवल्यानंतर माझी को चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करावे.