नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविड टीम इंडियाचे प्रशिक्षक होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. टी-२० विश्वचषकानंतर द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या वृत्ताला बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

टी-२० विश्वचषकानंतर भारताचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आता भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असेल. याबाबच दुबईमध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी द्रविडसोबत बैठक घेतल्याचे समजते.

दरम्यान, वॉनने ट्विटरवर लिहिले, राहुल द्रविड टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक असेल, हे खरे असेल तर बाकीच्या देशांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. द्रविडचे प्रशिक्षक बनल्याची बातमी समोर आल्यानंतर वॉनसोबत माजी भारतीय फलंदाज वसीम जाफरनेही एक मजेदार ट्विट केले.