‘आयएसएसएफ’ स्पर्धेत राही सरनोबतची ‘रौप्य’ कामगिरी : पालकमंत्र्यांकडून अभिनंदन

0
20

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत हिने दिल्ली येथे सुरू असलेल्या ‘आयएसएसएफ विश्वचषक २०२१’ च्या स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल (महिला) प्रकारात रौप्य पदक पटकावून कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. या कामगिरीबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी ट्विट करून राही सरनोबतचे अभिनंदन केले आहे.

या स्पर्धेत चिंकी यादव हिने सुवर्ण तर मनू भाकेर यांनी कास्य पदकाची कमाई केली असून प्रथमच भारताला या स्पर्धेत तीन पदके मिळाली आहेत. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.