वेतवडे येथील राधाबाई जाधव यांना आर्थिक मदतीची गरज

0
51

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील राधाबाई शिवाजी जाधव (वय ५५) यांना अप्लास्टिक अनिमिया या आजाराने ग्रासले असून, त्यामुळे त्यांच्या शरीरात पुरेसे रक्त व नवीन रक्तपेशी निर्माण होणे थांबले आहे. त्या गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोल्हापुरातील राजारामपुरी येथील डॉ. अभिजित गणपुले यांच्या निश हिमेटॉलॉजी केअर या दवाखान्यात उपचार घेत आहेत.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना लवकरात लवकर एटीजी ट्रीटमेंट चालू करणे गरजेचे असल्याने त्यासाठी आठ ते दहा लाख असा खर्च सांगितला आहे. राधाबाई जाधव यांच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने त्यांना समाजातील दानशूर मंडळी व संस्थांनी आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.

बँक- बँक ऑफ इंडिया कळे, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर, नाव- किरण शिवाजी जाधव (मुलगा), बँक खाते नंबर- 090610110010798, आयएफएससी कोड- BKIOD0000906, फोन पे किंवा गुगल पे नंबर -9552213135. या ठिकाणी मदत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.