कळे (प्रतिनिधी) : घरपण येथे दोन गटांमध्ये तूफान राडा झाला. यामध्ये सहाजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कळे पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, घरपण येथील सुनिल विष्णू मोळे (वय ४२) आणि बंडोपंत कृष्णा बिडकर (वय ७०) यांच्यात घराशेजारील जागेवरून वाद सुरु आहे. त्यातून त्यांच्यात आज पुन्हा वाद झाला.  यावेळी या दोघांचे कुटुंबीय एकमेकांना भिडले आणि तुफान हाणामारी झाली. दगड, खोरे, खुरपे, लाकडी स्टिक, काठ्या आणि लाकडी दांडक्याने झालेल्या हल्ल्यात एका गटातील सुनील मोळे, अजित मोळे, भगवान मोळे जखमी झाले. तर दुसऱ्या गटातील बंडोपंत बिडकर,सागर बिडकर, संग्राम बिडकर हे तिघे असे एकूण सहाजण आहेत जखमी झाले आहेत.

याप्रकरणी सुनील मोळे यांनी सागर बिडकर, शरद बिडकर, भरत बिडकर, तुषार बिडकर, बंडोपंत बिडकर, बाळासो बिडकर व विठ्ठल बिडकर या सात जणांच्या विरोधात तर बंडोपंत बिडकर यांनी भगवान मोळे, संजय मोळे, अजित मोळे, तुकाराम मोळे, सुनील मोळे,विष्णू मोळे, सर्जेराव मोळे, शैलेश मोळे या आठ जणांच्या विरोधात अशा परस्परविरोधी फिर्यादी कळे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत.