करवीरच्या पोलीस उपअधीक्षकपदी आर. आर. पाटील यांची नियुक्ती

0
583

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर उपविभागाच्या नूतन उपअधीक्षकपदी पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम रामराव उर्फ आर. आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर प्रशांत अमृतकर यांचे पिंपरी-चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या गृह विभागाने आज (शुक्रवार) जारी केले आहेत.

राज्यातील पोलीस उपअधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त व बदल्यांचे आदेश शुक्रवारी राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत. करवीरच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती झालेले आर. आर. पाटील यांनी यापूर्वी निरीक्षक तसेच शाहूवाडी उपविभागाचे पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार सांभाळलेला आहे.