आर. के. नगरातील बंद पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी : शिवसेनेची मागणी

0
32

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील आर.के.नगर येथील बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात यावी. अशी मागणी आज (मंगळवार) जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन उपजिल्हा प्रमुख महिला संघटीका स्मिता सावंत आणि शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहरातील उपनगरामध्ये चोरी, मारामारीसह विविध प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यातच आर.के.नगर मधील पोलीस चौकी बंदावस्थेत आहे. त्यामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी आर.के.नगर येथील बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी भाग्यश्री देशपांडे, दिपाली शिंदे, पुजा शिंदे उपस्थित होत्या.