कोल्हापूर (प्रतिनिधी) :  शिक्षण विभाग पंचायत समिती, कागल यांच्यावतीने सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील पूर्व उच्च माध्यमिक (५वी), पूर्व माध्यमिक (८वी) शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवोदय विद्यालय प्रज्ञाशोध परीक्षा (जि. प.) पात्र विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, डॉ. जे पी नाईक ‘माझी शाळा समृद्ध शाळा’ उपक्रमांतर्गत शाळांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागलच्या पं.स. सभापती पूनम मगदुम होत्या.

या कार्यक्रमाला ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी शैक्षणिक तंत्रज्ञान आणि माझे तंत्रस्नेही प्रयोग या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यामंदिर बामणी या शाळेला डॉ. जे पी नाईक माझी शाळा समृद्ध शाळा उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच सीईओ संजयसिंह चव्हाण, सत्यवान सोनवणे, आशा उबाळे, अंजना सुतार प्रवीण यादव, सूशिल संसारे, अंबरिष घाटगे, युवराज पाटील, शिवाणी भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा गुणगौरव सत्कार करण्यात आले.

या सत्कार सोहळ्यासाठी शाळा व्यवस्थापन कमिटीच्या उज्वला पाटील, सविता मगदुम, वैशाली पाटील, मेघा मगदुम, शिवाजी मगदूम, मुख्याध्यापक बी. वाय. कांबळे, शिक्षक स्टाफ उपस्थित होता.