कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर विभागातील प्रा. सुप्रिया महेश मोरे-पाटील यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कालिकतच्या वतीने आर्किटेक्चर विषयामधील डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

‘इन्व्हेस्टिगेशन ऑफ बसाल्ट अँड लॅटराईट स्टोन वेदरिंग इन हेरिटेज मॉन्युमेंटस् ऑफ महाराष्ट्र, इंडिया’ या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला आहे. एनआयटी कालिकत येथील डॉ. कस्तुरबा व डॉ. महेश वसंतराव पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आर्किटेक्चर विभागामध्ये प्रा. सुप्रिया मोरे-पाटील गेल्या ११ वर्षापासून कार्यरत आहेत. डॉ. सुप्रिया पाटील यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृह राज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य संतोष चेडे, आर्किटेक्चर विभागाचे डीन प्रा. आर. जी. सावंत, विभागप्रमुख प्रा. इंद्रजित जाधव यांनी अभिनंदन केले आहे.