प्रा. सर्जेराव राऊत ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ने सन्मानित

0
68

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चाटे शिक्षण संस्थेचे शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. सर्जेराव राऊत यांना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर या सामाजिक संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.

दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त पात्र शिक्षकांना त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर या संस्थेकडून नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येते. दरम्यान चाटे शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले आणि अनेक शिक्षकांचे आदर्श ठरलेले प्रा. सर्जेराव राऊत यांनी गेल्या २० वर्षात शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या अध्यापनाद्वारे गुणवत्ता यादीत आणले. तसेच त्यांनी विद्यार्थी आणि पालकांसाठी पाचशेहून अधिक व्याख्यानांद्वारे केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सहप्रवासी ठरले.

यासह त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत प्रा. सर्जेराव राऊत यांना रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर या सामाजिक संस्थेच्या वतीने यंदाचा नेशन बिल्डर अवॉर्ड हा पुरस्कार प्राचार्य क्रांतीकुमार पाटील, प्राचार्य विजय घोरपडे, रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर प्रेसिडेंट अरविंद कृष्णन, सेक्रेटरी सिद्धार्थ पाटणकर, महेंद्र परमार यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार म्हणजे यापुढे गुणवत्ता पुर्ण कार्यासाठी कार्यरत राहण्यासाठी  मिळालेले प्रोत्साहन आहे. अशी भावना यावेळी राऊत यांनी व्यक्त केली. तर उत्तम कार्य करण्याची प्रेरणा, आई-वडील साठी समाज संचालक प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे आणि सर्व सहकारी यांच्याकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.