कळे येथील प्रा. विक्रम यमगेकर यांना क्रिडा भूषण पुरस्कार…

0
65

कळे (प्रतिनिधी) : कळे येथील विठ्ठलराव पाटील महाविद्यालयातील  शारिरीक शिक्षण संचालक प्रा. विक्रम यमगेकर यांना अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फौंडेशनचा क्रीडा भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना नाशिकचे जिल्हा शिक्षणाधिकारी एस.व्ही. कदम आणि राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

यावेळी नाशिक शिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख, अविष्कार फौंडेशन अध्यक्ष माननीय नारायण गडाख त्याचबरोबर अविष्कार फाऊंडेशनचे प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.