टोप (प्रतिनिधी) : शिये (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला धक्का देत जय हनुमान विकास आघाडीने १७ पैकी १० जागा जिंकत सत्तांतर केले. तर शिवसेनेला ६ जागावर समाधान मानावे लागले.

मागील पाच वर्ष ग्रामपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. त्यामुळे  शिवसेनेकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप यांनी एकत्र मोट बांधत जय हनुमान विकास आघाडीची स्थापन केली. या आघाडीने १० जागांवर विजय मिळवला, शिवसेनेला ६ जागांवर विजय मिळवण्यात यश आले. तर एक अपक्ष विजयी झाला.

विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.  शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गावात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

श्रीरामनगरचा गड शिवसेनेने राखला

सरपंचपद भूषविलेले रणजित कदम यांनी आपला श्रीरामनगरचा गड कायम राखत तिन्ही जागांवर विजय संपादन केला.