औरंगाबाद (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्येच तुल्यबळ लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मराठावाड्यातील भाजप नेत्याने पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.    

  

 

ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा आज (मंगळवार) राजीनामा दिला आहे.  मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले गायकवाड नाराज झाले.  त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. आता त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता भाजपकडून त्यांची मनधरणी केली जाणार का ? त्यात भाजपला यश येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.