मुंबई (प्रतिनिधी) :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला आहे. यावेळी त्यांनी, मी कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे. आणि स्मृतीस्थळ शुद्धीकरण करण्याऐवजी मनं शुद्ध करा असा  टोलाही राणेंनी शिवसेनेला लगावला.

मंत्री राणे म्हणाले की, मी पॅन्ट वर करुन दलदलीतून बाळासाहेबांच्या स्मारकापर्यंत पोहोचलो. बाळासाहेबांबाबत इतका आदर असेल तर ते स्मारक जागतिक दर्जाचे करावे. मी फक्त गोमुत्रासाठी आलो आहे का ? ज्याला गोमूत्र शिपंडायचे त्यांनी शिंपडावे. मला कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे. स्मृतीस्थळ शुद्धीकरण करण्याऐवजी मनं शुद्ध करा असा टोलाही त्यांनी लगावला.

तसेच औषधात पैसे खाणाऱ्या या लोकांना हिंदू धर्मात पवित्र असलेले गोमूत्र हातात  धरायची पण लायकी नाही. बाळासाहेंबाच्या स्मारकावर जाऊन नतमस्तक झालो. आणि मी साहेबांना म्हणालो की, आज तुम्ही मला आशिर्वाद द्यायला हवा होतात. तर हा ३२ वर्षांचा मुंबईतील बकालपणा घालवायचा असेल तर सत्तांतर होणं गरजेचं आहे. मुंबईत मनपात भाजपची सत्ता आल्यास शहराचे रुप बदलून टाकू, अशी प्रतिक्रिया यावेळी नारायण राणेंनी व्यक्त केली.