कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील आरटीओ कार्यालय परिसरात  ठिय्या मांडून बसलेल्या पंटरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारीस यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, आरटीओ कार्यालय हे वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत येत असते. त्यामध्ये कार्यालयात पंटरांचा वावर होत आहे. हे पंटर वाहनधारकांना अपमानास्पद वागणूक देत असून अशा प्रवृत्तीच्या लोकांमुळे आरटीओ कार्यालयाची बदनामी होत आहे. तसेच काही कर्मचारी सुध्दा कार्यालयीन वेळेत आपल्या जागी न बसता इतरत्र वावरत असतात. त्यामुळे अशा पंटरांचा बंदोबस्त करून कामचुकार कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी मराठा महासंघाचे इचलकरंजी शहराध्यक्ष संतोष सावंत, अवधूत पाटील, पुंडलिक जाधव, विजय मुतलिक, आशिष सावंत, योगेश नागांवकर, उत्तम खंदे, अरविंद माने, दिपक रावळ, संतोष चव्हाण, अरुण मस्कर, धनंजय पाटील उपस्थित होते.