पंजाबच्या टीम ‘आप’ मध्ये १२ डॉक्टर, ७ वकील आणि…

0
87

पंजाब (वृत्तसंस्था) : नुकतेच पंजाब विधानसभा निवडणुकीत ११७ जागांपैकी ९२ जागांवर ‘आप’चे उमेदवारांनी विजय नोंदवला. यातील तब्बाल ८२ जण हे नवोदित आहेत. आमदार झालेल्यांकमध्येल १२ डॉक्टिर, ७ वकील, दोन लोकप्रिय गायक, दोन पंजाबमधील निवृत्त पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी, ऑक्सवफर्डचे पदवीधर, माहिती अधिकार कार्यकर्ते आदींचा समावेश आहे. म्हणजेच आपचे बहुतांश उमेदवार हे उच्चविद्याविभुषित आहेत.

पंजाब विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय नोंदवल्यातनंतर आपचे निमंत्रक आणि दिल्ली चे मुख्य मंत्री अरविंद केजरीवाल म्हनणाले होते की, आम आदमी पार्टी हा देशातील सर्वसामान्यह नागरिकांचा पक्ष आहे. याचे उदाहरण म्हाणजे, पंजाबमध्येर निवडणून आलेल्या  लाभ सिंग उगोके हा स्वाच्छआता कामगाराचा मुलगा आहे. लाभ सिंग हा स्व्त: एका मोबाईल दुकानामध्येो मोबाईल फोन दुरुस्ती‍चे काम करत होता. लाभसिंग याने भदौर मतदारसंघात पंजाबचे माजी मुख्योमंत्री चरणजीत सिंग चन्नी् यांचा पराभव करत नवा इतिहास घडवला आहे.

आपल्या कडे लोकप्रतिनिधी आणि त्याकचं शिक्षण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. राजकारणाच्याय रिंगणात उच्चविद्याविभुषित उमेदवारांची गर्दी तशी कमीच दिसते. मात्र पंजाबमध्येर हा निकष आम आदमी पार्टीने बदलला आहे