घरगुती कचरा इतरत्र टाकल्यास दंडात्मक कारवाई : डॉ. अशोक पोळ

0
95

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दैनंदिन घरगुती कचरा इतरत्र टाकू नये, अथवा जाळू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी दिला आहे.

शहरांतर्गत दैनंदिन निर्माण होणारा कचरा संकलनासाठी महापालिकेच्यावतीने ॲटो टिपर, घंटागाडीची सोय करण्यात आली असून, नागरिकांनी हा कचरा ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा असे वर्गिकरण करुन ॲटो टिपर, घंटागाडीकडेच द्यावा, असे आवाहनही आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी केले आहे.