उघडयावर कचरा जाळल्याबद्दल दंडात्मक कारवाई

0
66

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील रुईकर कॉलनी प्रभागात घराच्या परिसरातील कचरा उघडयावर जाळल्याबद्दल दोन नागरिकांवर उपायुक्त निखिल मोरे यांनी दंडात्मक कारवाई केली. तर त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपयांचा दंड वसूल केला.

स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत शहरात सुरु असलेल्या स्वच्छता कार्यक्रमाची आज (मंगळवार) दंड उपायुक्त निखिल मोरे आणि सहायक आयुक्त संदिप घार्गे यांनी आज सकाळी ६.३० वाजता अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुईकर कॉलनी प्रभागातील दोन नागरिक कचरा जाळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तात्काळ त्यांनी आरोग्य पथकामार्फत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.