कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात  कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका, केएमटी आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली.  यामध्ये २७४ जणांकडून ३३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे,  सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे,  सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग करणाऱ्याविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे.           

शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सण, समारंभ,  धार्मिक स्थळे,  भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा,  सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.