कोल्हापूर (प्रतिनिधी) : विश्व हिंदू परिषदेचे प्रांत विशेष संपर्कप्रमुख श्रीकांत सर्जेराव पोतनीस यांची पुणे जनता सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. पोतनीस यांच्या या नियुक्तीबद्दल कोल्हापुरातील हिंदुत्वादी संघटनाच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

श्रीकांत पोतनीस हे गेली अनेक वर्षे प्रखर हिंदुत्वाचे काम करत आहेत. अनेक हिंदुत्ववादी चळवळीत आणि हिंदू धर्म जतन व प्रसाराच्या उपक्रमामध्ये ते अग्रभागी आहेत.ते कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित उद्योगपती असून, गोशिमा या संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उद्योजक आणि कामगार हिताचे काम केले आहे. त्यांची पुणे जनता सहकारी बँकेवर संचालकपदी नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सुधीर जोशी वंदूरकर,  बाबा वाघापूरकर, उदय भोसले, कमलाकर किलकिले, चंद्रकांत बराले, हिंदुराव शेळके, शाम जोशी, किशोर घाटगे, पराग फडणीस, राजू गडकरी, रामाराव आदी हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.