पुणे ‘पदवीधर’, ‘शिक्षक’साठी पन्हाळा तालुक्यात उच्चांकी मतदान…

0
95

पन्हाळा (प्रतिनिधी) :  पुणे पदवीधर मतदारसंघातील पन्हाळा तालुक्यात पदवीधर ६८ टक्के तर शिक्षकांचे ८५ टक्के मतदान झाल्याची माहीती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दिली. हे मतदान तालुक्यातील १२ केंद्रावर शांततेत पार पडले.  

पदवीधरांचे मतदान ४ हजार ९५६ होते. या निवडणूका कोरोना काळात होत असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात आला होता. तसेच या निवडणूकांसाठी तालुक्यात कोडोली ४, कोतोली २, तर सातवे,  पन्हाळा, आसुर्ले, बाजारभोगाव, पडळ, कळे येथे प्रत्येकी १ अशी एकुण १२ मतदान केंद्रे होती.