पुणे (प्रतिनिधी) : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये आज एका डबल इंजिन विमानाला अपघात होऊन ते कोसळले. भारतीय वंशाच्या सुरिझोना येथील युमा रिजनल मेडिकल सेंटरमध्ये इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करणाऱ्या डॉ. सुगाता दास यांच्यासह दोन जणांचा मृत्यू झाला. यावेळी दास हे विमान चालवत होते की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

सँटी येथील सँटाना हायस्कूलजवळ झालेल्या अपघातामुळे दोन घरे जळाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. आग इतर घरांमध्ये पसरण्यापूर्वी अग्निशमन दलाच्या जवानांनी परस्थिती आटोक्यात आणली. मरण पावलेली आणखी एक व्यक्ती युपीएस कामगार होती, अशी माहिती मिळाली.