यड्राव येथे जवानाच्या हस्ते ‘पल्स पोलिओ’ लसीकरण  

0
111

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव येथे  पल्स पोलिओ लसीकरण शिबिराला आज (रविवारी) सकाळी सुरुवात झाली. या शिबिराचे उद्‌घाटन बीएसएफ  जवान विनायक लवाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्यसेविका भाटे, आरोग्यसेवक किरण एरंडोले,  लीना बाबर,  मदतनीस वनिता रेंडाळे,  आशाराणी कोळी आदी उपस्थित होत्या.

सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५  वाजेपर्यंत हे अभियान चालू असणार आहे. आरोग्य केंद्र,  बस स्थानक, रेल्वे स्टेशन, शाळा, टोल नाके सर्व सरकारी दवाखाने या ठिकाणी लसीकरण शिबिर राबवण्यात येणार आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओ लस दिली जाणार आहे. लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित राहू नये, म्हणून सोशल मीडिया,  टेलिव्हिजनवर  आवाहन करण्यात  येत आहे.