कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने आज (गुरुवार) बार्शीतील पत्रकार सचिन वायकुळे लिखित ‘पत्रकारिता शोध आणि बोध’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात हा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिलकुमार लवटे होते.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस आणि कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्‍त विनायक औंधकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. डॉ. सुनिलकुमार लवटे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  यावेळी सांगली जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, मिरज-कुपवाड नगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, विद्यार्थी आदी उपस्थित होते.