जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘शिवधर्म दिनदर्शिके’चे प्रकाशन

0
270

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रकाशित केलेल्या ‘मराठा सेवा संघ शिवधर्म दिनदर्शिके’चे प्रकाशन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते आज (मंगळवार) करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले की, तरुणांनी गटातटाच्या राजकारणात अडकून न राहता महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपली वाटचाल करावी.  

शिवधर्म दिनदर्शिकेमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा दिलेला नाही. सर्व महापुरुषांचे जन्मदिवस व स्मृतीदिवस याची नोंद करण्यात आलेली आहे. दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर स्वामी विवेकानंद यांचे आकर्षक तेजस्वी छायाचित्र आहे. तसेच प्रत्येक पानावर स्वामी विवेकानंद यांचे विचार, शिकवण यांची माहिती दिली आहे.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा शिंदे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, पृथ्वीराज राणे, अजय शिंदे, उदय कारंडे, अभिजीत भोसले, अभिजीत कांजर, अमृत पाटील, निलेश सुतार, शहाजी देसाई, सुरेश साळोखे आदी उपस्थित होते.