तंबाखू मुक्तीसाठी जनजागृतीपर शपथ

0
30

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू मुक्तीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जनजागृतीपर शपथ घेण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षातील सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे यांनी तंबाखू मुक्तीची शपथ दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास समुपदेशक चारुशीला कणसे, प्रियांका लिंगडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.