गारगोटी (प्रतिनिधी) : बामणे (ता. भुदरगड) येथील हनुमान दूध संस्थेचे चेअरमन वसंत बोरनाक व संस्थेचे संचाला, भावेश्वरी सेवा संस्थेचे चेअरमन पांडुरंग लोंढे व आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गारगोटी येथे आ. प्रकाश आबिटकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी शिवबंधन बांधले.

या वसंत बोरनाक म्हणाले की, मागील ७ वर्षांत आ. आबिटकर यांनी मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. तालुक्यांत त्यांनी केलेल्या कामांना पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊनच  गावातील आम्ही सर्व प्रमुख लोक शिवसेनेत प्रवेश करत आहोत.

आ. आबिटकर म्हणाले की, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे सूत्र असून त्यादृष्टीने सर्वांनी समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी कामाला लागा असे सांगितले. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक नागरिकाचा विकास साधण्याकरिता शिवसैनिकाने काम केले पाहिजे असे म्हणाले.

या वेळी ग्रा. पं. सदस्य रघुनाथ बोटे, माजी चेअरमन पांडुरंग बोरनाक, माजी उपसरपंच संजय इंगळे, महेश बोरनाक, विद्याधर परीट, सर्जेराव बोटे, प्रमोद खवरे, अरूण खवरे, राम बोटे, दत्तात्रय बोरनाक, संभाजी पाटील, सर्जराव पाटील, अर्चना पाटील आदी उपस्थित होते.