तेजस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावडा कोव्हिड सेंटरला वाफेची मशीन प्रदान…

0
34

कसबा बावडा (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम सेवा संस्थेच्या सभागृहात नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरसाठी १५० वाफेची मशीन देण्यात आली. यावेळी तेजस पाटील यांनी, या केंद्रामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या पण घरी अलगीकरणाची सोय नसणाऱ्या कोरोना रुग्णांची चांगली सोय होईल. त्यामुळे त्यांचे कुटूंबही सुरक्षीत राहील असेही तेजस पाटील यांनी सांगितले. यावेळी श्रीराम सेवा संस्थेचे उपसभापती संतोष पाटील यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी कोव्हिड सेंटरचे समन्वयक गजानन बेडेकर, हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य डॉ. महादेव नरके, श्रीराम सेवा संस्थेचे संचालक राजीव चव्हाण, प्रमोद पाटील, प्रविण लाड, विलास पिंगळे, सागर रणदिवे,  मनोहर माळी, सुनिल कोळी, महादेव लांडगे आदी उपस्थित होते.