गारगोटी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, भुदरगडच्या वतीने ऑक्सिजन निर्मिती मशीन आणि फळे प्रदान करण्याचा कार्यक्रम गारगोटी कोव्हिड केंद्रात संपन्न झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, सरचिटणीस प्रमोद तौंदकर यांच्या हस्ते ऑक्सिजन निर्मिती जनरेटर पं.स. उपसभापती सुनील निंबाळकर, वैद्यकिय अधिक्षक डॉ. भगवान डवरी, डॉ.सचिन यत्नाळकर यांना प्रदान करण्यात आले.

भुदरगड तहसीलदार अमोल कदम म्हणाले, शिक्षक समितीने कोव्हिड केंद्राला ऑक्सिजन जनरेटर देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांचे कार्य प्रशंसनीय आणि मोलाचे असल्याचे सांगितले.

माजी जि.प.सदस्य राहुल देसाई म्हणाले, ज्ञानदानाबरोबरच कोव्हिड काळात भुदरगड शिक्षक समितीची हे दातृत्व कृतज्ञतेचे आणि समाजभानाचे असल्याचे सांगितले.

यावेळी कै.शकुंतला राजाराम चौगले यांचे स्मृतिप्रीत्यर्थ विनायक आणि युवराज चौगले यांचे वतीने कोव्हिड केंद्रातील डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय अधिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सफाई कर्मचारी, पोलीसांना सन्मानचिन्ह, पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गटशिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगले यांच्या हस्ते कोरोना रुग्णांसाठी फळांचे वाटप करण्यात झाले.

यावेळी राज्य ऑडिटर राजेंद्र पाटील, राज्य प्रसिध्दी प्रमुख हरिदास वर्णे, गारगोटी सरपंच संदेश भोपळे, डॉ.सचिन सुतार, डॉ.इंद्रजित गुरव, दत्तात्रय रब्बे, तुकाराम मातले, आनंदराव जाधव, तानाजी सणगर, बाळ हळदकर, आर.डी.पाटील, सुनील मोरे, आनंदा राणे आदी मान्यवर उपस्थित होते.