भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे कोल्हापुरात निदर्शने

0
67

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (शनिवार) गांधी मैदानात दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली. या वेळी राष्ट्रपित्याच्या पुतळ्यासमोर ‘अमर रहे, अमर रहे महात्मा गांधी अमर रहे, जिंदाबाद जिंदाबाद महात्मा गांधी जिंदाबाद यासह केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात कॉ. चंद्रकांत यादव ,प्राचार्य टी. एस. पाटील, संभाजी जगदाळे, बी. एल. बरगे, रवी जाधव, राजाराम धनवडे, रमेश वडणगेकर, सुनीता जाधव यांच्यासह अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.