इचलकरंजीत वाहतूक सेनेच्यावतीने कर्नाटक शासनाचा निषेध

0
54

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातील वाहनांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केला आहे. तसेच शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांना धक्काबुक्की केली. या घटनेचा निषेध करून महाराष्ट्र वाहतूक सेनेच्यावतीने एसटी बस स्थानकावर आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

त्यानंतर आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले. कर्नाटकच्या बसेस बसस्थानकातून मोकळ्या परत पाठविण्या याव्यात. तसेच कर्नाटकच्या बसला महाराष्ट्रात येण्यास मनाई करावी, अन्यथा कर्नाटक बसेस फोडू, असा इशारा यावेळी देण्यात आला.  

शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेवराव गौड, शहरप्रमुख सयाजीराव चव्हाण, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख शिवानंद हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली मेहबूब पठाण, संजय खोत, इम्रान सनदी, सागर कुराडे, बाळू आनव, प्रकाश बनहट्टी, सूरज जाधव आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.