करवीर कामगार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

0
34

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री आवास योजनेची इचलकरंजी शहरात अंमलबजावणी करण्यात यावी. या मागणीसाठी आज (मंगळवार) करवीर कामगार (आयटक) संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी इचलकरंजी शहरातील नागरिकांना शहापूर येथे घरकुलासाठी गट नं. ४६८ जागेला मंजूरी मिळावी. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. परंतु, त्याला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने गट नं.४६८ ला मंजुरी मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी, कॉ. हणमंत लोहार, महेश लोहार, मारुती आजगेकर, शिवाजी जाधव, प्रमोद सपाटे, शशिकांत सदलगे, मिना भोरे, दादू मगदूम, मुमताज मुल्ला, हुसेनबी रोन्याळ, अनिल सामंत उपस्थित होते.