इचलकरंजीतील हल्याचा निषेध

0
103

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निषेध केला.

यावेळी लेखी आदेश देईपर्यंत कोणत्याही वीज ग्राहकाचे कनेक्शन तोडू नये, असे आवाहनही करण्यात आले. शिवाय हल्लेखोरांवर त्वरित कारवाई केल्याबद्दल पोलिस प्रशासनाचे अभिनंदनही करण्यात आले.
यावेळी सुभाष फाळके, प्रदीप चौगुले, दगडू हंकारे, अभिषेक पाटील, पी. आर. कदम, सुनिल खाडे, जयकुमार खटावणे, निकिता नाईक, महेश खांडेकर, प्रवीण झेंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.