कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील ताराबाई पार्कातील मनिष पार्क येथील भाड्याने घेतलेल्या रो बंगल्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा टाकला.

या कारवाईत गौतम संजय धामेजा (वय २१, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गांधीनगर) व खुशबू सादिक खाटीक (वय ३६, रा. कदमवाडी) या दोघा एजंटांना अटक करण्यात आली असून, एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले, सहायक फौजदार रवींद्र गायकवाड, राजेंद्र घारगे, हे.कॉ आनंदराव पाटील, किशोर सूर्यवंशी, सायली कुलकर्णी, मीनाक्षी पाटील, अभिजित घाटगे, शुभांगी कांबळे यांनी केली.