कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात यापुर्वीच्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश आणि स्पष्टीकरणांना १ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते दिनांक १५ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

पत्रकात म्हटले आहे की,  दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तुंच्या वाहतूकीवर निर्बंध नाहीत. मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही तसेच दंडही आकारण्यात येणार आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.