कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव आणि विजयादशमी सार्वजनिकरित्या साजरा करण्यास प्रतिबंध करणारा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढला आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, विश्वस्त, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट यांनीही २५ ऑक्टोबर रोजी दसरा चौकात होणारा शाही दसरा व विजयादशमी निमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील इतर नागरी, ग्रामीण भागात नवरात्री, विजयादशमी दिवशी होणारे कार्यक्रमावरही बंदी घालण्यात आली आहे. शहर, परिसरात नवरात्री कालावधीत तसेच दसरा चौकातील विजयादशमीचे सोने लुटणे, सीमोल्लंघन आदी गर्दीचे कार्यक्रम करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांचे व उत्सवाचे स्वरूप वैयक्तिक, घरगुती राहील. प्रशासनाच्या या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.