छ. शिवरायांना डोक्यावर नव्हे, तर डोक्यात घ्या : प्रा. ए. एस. भागाजे

0
135

कळे (प्रतिनिधी) : जीवन म्हणजे संघर्षाची कर्मभूमी आहे त्याच ताकदीने परिस्थितीचा मुकाबला करा, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रामाण्य मानून वाटचाल केल्यास यशाच्या अच्युत्य शिखरावर पोहचू शकाल, शिवरायांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जा, असे आवाहन प्रा. ए. एस. भागाजे यांनी बळपवाडी (ता. पन्हाळा) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

त्यानंतर सिद्धेश कुपले यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. पी. आर. कुंभार, उपसरपंच सचिन केसरकर, ज्ञानू गुरव, संग्राम तेली, सुधाकर टिपुगडे, सचिन कांबळे, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.