कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सुदर्शन नारायण सुतार यांना ‘शिक्षा गौरव पुरस्कार-२०२२’ ने सन्मानित करण्यात आले. युनिव्हर्सल मेंटॉर असोसिएशनच्या वतीने मुंबईत झालेल्या समारंभात प्रा. सुतार यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात ‘टीपीओ ऑफ द इअर’ म्हणूनही त्यांचा सन्मान करण्यात आला.

‘युनिव्हर्सल मेंटॉर असोसिएशन’च्या वतीने आयोजित चौथ्या ‘एज्युलिडर समीट’ मध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे हा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. प्रा. सुदर्शन सुतार यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल राष्ट्रीय स्तरावर ‘शिक्षा गौरव पुरस्कार’ ने तर ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून अभियांत्रिकी विद्यार्थ्याना उत्तम करिअर संधी मिळवून दिल्याबद्दल ‘टीपीओ ऑफ द इअर’ या दोन पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

प्रा. सुदर्शन सुतार यांनी विद्यार्थ्यासाठी उत्तम प्लेसमेंट संधी उपलब्ध करून देण्यात मोठे योगदान दिले आहे. कोरोना काळातही ऑनलाईन माध्यमातून शेकडो विद्यार्थ्याना प्लेसमेंट देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ऑनलाईन ट्रेनिंग, मॉक इंटरव्ह्यू, चर्चासत्रे, परिषद, संमलेन, गेस्ट लेक्चर या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी उत्तम तयारी घडवून घेतली जाते.

या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ लीतेश मालदे यांनी प्रा. सुदर्शन सुतार यांचे अभिनंदन केले.