अकिवाट येथे चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

0
35

शिरोळ (प्रतिनिधी) : अकिवाट (ता.शिरोळ) येथे ‘ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. ही स्पर्धा युवासेना विस्तारक डॉ. सतीश नरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा युवा अधिकारी शिवाजी पाटील, शिरोळ तालुका अधिकारी प्रतीक धनवडे, तालुका समन्वयक निलेश तवंदकर यांनी आयोजित केली होती.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, तालुका प्रमुख वैभव उगळे, महिला आघाडीच्या मंगलताई चव्हाण, माधुरी ताकरे, रेखा जाधव, सारीका मडीवाळ, वैशाली जुगळे, युवासेनेचे मंगेश पाटील, अक्षय हेरवाडे, मल्हार कुलकर्णी, महेश चौगुले आदीसह स्पर्धक उपस्थित होते.