जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान जैसलमेरच्या सीमेवर

0
49

जैसलमेर (वृत्तसंस्था) : दरवर्षीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यासाठी यंदा ते राजस्थानमधील जैसलमेरच्या सीमेवर पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सीडीएस बिपीन रावत, लष्करप्रमुख एम. एम. नरवणे आणि बीएसएफचे महासंचालक राकेश अस्थाना उपस्थित आहेत.

राजस्थानमधील जैसलमेर येथून भारत-पाकिस्तानची सीमारेषा जाते. या ठिकाणी सीमेवर बीएसएफचे जवान तैनात आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी येथील लोंगेवाला भागात बीएसएफच्या जवानांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच दिवाळीनिमित्त त्यांना मिठाईचे वाटप देखील करणार आहेत.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना आवाहन केले होते की, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अखंड खडा पहारा देत असलेल्या आपल्या बहादूर सैनिकांना मानवंदना म्हणून, एक पणती या दिवाळीमध्ये लावावी.