नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही, अशा भावना व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ (विभाजन विभीषिका स्मृति दिवस) म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा केली. याबाबतचे ट्विट पंतप्रधानांनी केले.  

या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू-भगिनींना स्थलांतरित व्हावं लागले. काहींना तर आपला जीवही गमवावा लागला. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाची आठवण ठेवत १४ ऑगस्टला ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे.  हा दिवस आपल्याला भेदभाव, शत्रूत्व आणि द्वेष संपवण्यासाठी फक्त प्रेरणा देणार नाही. तर यामुळे एकता, सामाजिक सद्भावना आणि भावना मजबूत होतील, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.