कारगिल : देशभरात प्रत्येक जण आनंदाने आणि उत्साहाने दिवाळी साजरी करत आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर प्रत्येक वर्षी भारताच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यापूर्वीही त्यांनी सीमेवरील विविध भागात जाऊन भारतीय लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. यावेळी ते जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत जम्मू-काश्मीरमधील कारगिल द्रास येथे भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी कारण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील आठ वर्षांपासून भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून ते नेहमीच देशसेवेसाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत पंतप्रधान मोदी यावेळी जम्मू-काश्मीरमधील कारगिल द्रास येथे भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी कारण्यासाठी पोहोचले.

या आधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी साजरी कारण्यासाठी देशाच्या सीमारेषेवर जाऊन जवानांना भेटले होते. दरम्यान २१  ऑक्टोबर रोजी मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ आणि बद्रीनाथच्या दर्शनासाठी आले होते. यानंतर त्यांनी २३ ऑक्टोबरला अयोध्येच्या दीपोत्सवालाही विशेष उपस्थिती लावली होती. अयोध्येला पाहोचल्यावर मोदींनी श्री रामांचे दर्शन घेतले.

सैनिकांच्या शौर्यासमोर आकाशदेखील झुकतो. कारगिलचे क्षेत्र भारतीय सेनेच्या शौर्याचे प्रतीक आहे. शिखरावर बसलेला शत्रूदेखील भारतीय सेनेच्या साहसासमोर छोटा होतो. सैनिक हे सीमेचे रक्षक असून देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहात. तुम्ही देशाच्या सीमेवर आहात म्हणून देशातील लोक सुखात आहेत. देशाच्या सुरक्षेला संपूर्णता देण्यासाठी आपला प्रत्येक नागरिक प्रयत्न करत आहे. देशाची सीमा सुरक्षित असते, अर्थव्यवस्था सुदृढ असते आणि समाज आत्मविश्वासाने ओतप्रोत असतो तेव्हाच देश सुरक्षित असतो. देशाच्या ताकदीबद्दल ऐकल्यानंतर सैनिकांचेही मनोबल वाढत असेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.