शिवसेनाप्रमुखांचा मूलमंत्र “शिवसेवा मास” संकल्पनेतून आचरणाचा अभिमान : श्री.राजेश क्षीरसागर 

0
28

 कोल्हापूर (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत “१९ मे ते १९ जून” दरम्यान शिवसेवा मास या उपक्रमाचे आयोजन केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिलेला मूलमंत्र म्हणजे ८०% समाजकारण आणि २०% राजकारणाचा आजही शिवसैनिकांकडून जपला जात असल्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी काढत या सामाजिक उपक्रमांचा लाभ समाजातील सर्व घटकांनी घ्यावा असे आवाहनही केले. या उपक्रमाचा शुभारंभ राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला.

या शिवसेवा मास अंतर्गत वृक्षारोपण, ई-श्रम कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड दुरुस्ती मोबाईल लिंकिंग, वाहन परवाना शिबीर, रेशनकार्ड शिबीर, आरोग्य शिबीर, रोजगार मेळावा, संजय गांधी निराधार योजना शिबीर व २००० मोफत अर्जांचे वाटप, जेष्ठ नागरिक सवलत कार्ड, विविध महामंडळाच्या योजनांची शिबिरे तसेच जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, लहान मुलांसाठी ऐतिहासिक चित्रपटाचां शो, धर्मवीर चित्रपटाचा शो, शिवसेना शाखांची उद्घाटने आदी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, उत्तरेश्वर वाघाची तालीम अध्यक्ष दिपक काटकर, सुभाष कदम, मनोज घाटगे, युवराज तोडकर, रियाज बागवान, किरण मांगुरे, अरुण सावंत, सुरेश कदम, बंटी रावळ, सनी अतिग्रे, राकेश पोवार, किशोर खोत, अनंत पाटील, प्रदीप कोंडेकर, गणेश धनवडे, दीपक लिंगम, सुदर्शन सावंत, इंद्रजीत सावंत, अमर जाधव, निलेश हंकारे आदी शिवसेना पदाधिकारी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.