इचलकरंजी (प्रतिनिधी) : अब्दुललाट येथील झेंडा चौक तरूण मंडळाचे वतीने गणेशोत्सवानिमित्त सामाजिक विषयावर प्रबोधनात्मक लघुपटाचे सादरीकरण  करण्यात आले. यावेळी प्रदूषण, कोरोना लसीकरण, सर्वधर्मसमभाव आदी विषयावर  प्रश्नोत्तरांचा कार्यक्रमही रंगला. तर पावसाच्या सरीतही नागरिकांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात भारतीय संविधान अभंग, मॅन, कोवीड लसीकरण, लड्डू या लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. तर प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना पुस्तके भेट देण्यात आली. इचलकरंजी येथील महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या सहकार्यातून हा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला. संवादक म्हणून संजय रेंदाळकर यांनी काम पाहिले.

दादासाहेब पाटील यांनी स्वागत केले. समन्वयक म्हणून कुदरत मुल्ला, सनोफर नायकवडी, मुर्तजा नायकवडी यांनी भूमिका बजावली. तांत्रिक सहकार्य अमोल पाटील, दामोदर कोळी यांनी केले. यावेळी अध्यक्ष दशरथ लोहार, प्रफुल्ल आवळे, ओम कोष्टी, तोहिद माणगावे, श्रेयस बदडे, अशोक वरुटे आदी उपस्थित होते. आझाद शेख यांनी आभार मानले.