इचलकरंजीत पूर्ववैमनस्यातून युवकावर प्राणघातक हल्ला : चौघांवर गुन्हा

0
145

इचलकरंजी (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून चौघांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला. राहुल इंद्रजित पोळ (वय २६, रा. कबनूर) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री इचलकरंजीतील बरगे मळ्यात घडला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील सिद्धार्थ हौसिंग सोसायटीमध्ये राहणारे आशितोष भाईमाने, रोहन कांबळे, तुषार शिंदे, विकास शेवाळे आणि कबनूर येथील राहुल पोळ यांच्यात किरकोळ कारणावरुन वैमनस्य निर्माण झाले आहे. त्याच कारणातून यापूर्वीही चौघांनी तीनवेळा राहुल याला मारहाण केली होती. शुक्रवारी रात्री राहुल हा बरगे मळा परिसरात आला होता. त्यावेळी उपरोक्त चौघा संशयितांनी यंत्रमागाच्या मार्‍याने त्याला जबर मारहाण केली. त्यामध्ये राहुल हा गंभीर जखमी झाला असून त्याला नातेवाईकांनी उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले.