मान्सूनपूर्व चॅनल सफाई कामाची प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून पाहणी.

0
49

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चॅनल सफाई कामाची पाहणी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून करण्यात आली. आज सकाळी राजारामपुरी येथील चॅनल सफाईची त्यांनी पाहणी केली. आज सकाळी राजारामपुरी जनता बझार चौक येथील चॅनलची सफाई करण्यात आली. या ठिकाणी मोठया प्रमाणात कचरा, प्लॅस्टीक, थर्मोकॉल, प्लॅस्टीक बॅनर्स, बाटल्या व इतर कचरा या नाल्यातून काढण्यात आला. यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त विनायक औंधकर, उप-शहर रचनाकार रमेश मस्कर, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे,संजय मोहिते आदी उपस्थित होते.

शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षी आजअखेर 1458 टन गाळ उठाव करण्यात आला असून शहरातील साधाणत: लहान मोठया नाले सफाईचे 78 टक्के काम पुर्ण झाले असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. उर्वरीत राहिलेल्या 21 प्रभागातील गाळ काढणेचे काम 30 में पूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.