भाजपच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रविणसिंह सावंत

0
142

गारगोटी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रविणसिंह सावंत यांची निवड करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सावंत यांना निवडीचे पत्र दिले. तर या निवडीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभले.

सावंत यांनी यापूर्वी भाजपचे जिल्हा सरचिटणीस, जीवन प्राधिकरणाचे संचालक  पद भूषविले आहे. चंद्रकांत पाटील यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. भाजपच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचे भरीव योगदान असून सामान्य लोकांशी त्यांचा सातत्याने संपर्क असतो.

जिल्हा उपाध्यक्ष पदामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने काम करू, असे मनोगत सावंत यांनी निवडीनंतर व्यक्त केले आहे.