Published September 24, 2020

चंदगड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांची निवड करण्यात आली. चंदगडचे सामाजिक कार्यकर्ते  प्रविण मल्लीकार्जून वाटंगी यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात झाली.

या व्यतिरिक्त अमरोळीचे सामाजिक कार्यकर्ते महादेव दत्तू मंडलिक-पाटील, मागासवर्गीय सदस्य कृष्णा यल्लापा कांबळे, इतर मागासवर्गीय सदस्य म्हणून सलीम कासीम मोमीन व गुंडू यल्लाप्पा मेटकुपी,  सर्व साधारण प्रवर्ग अशासकीय प्रतिनिधी मारुती खेत्रू पाटील, अपंग प्रवर्ग सदस्य रणधीर परशुराम सुतार, सामाजिक क्षेत्रातील सदस्य म्हणून अशोक शिवाजी मनवाडकर,जेष्ठ नागरीक सदस्य सोमनाथ पांडूरंग गवस, महिला अशासकीय प्रतिनिधी सदस्य म्हणून संज्योती संतोष मळवीकर यांची निवड करण्यात आली आहे.

या समितीवर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे सदस्य म्हणून काम करतात, तर तहसीलदार या कमिटीचे सचिव असतात. सजंय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, आर्थिक दुर्बलासाठीच्या इंदिरा गांधी वृध्दापकाळ, विधवा, दिवांग व्यक्तीना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी या सर्वांची निवड करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023